शबरीमाला मंदिर युद्धक्षेत्र व्हावे यासाठी आरएसएस प्रयत्नशील-मुख्यमंत्री विजयन

0

थिरूवनंतपुरम- केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र अद्यापही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. यावरून राजकारण तापले आहे. दरम्यान शबरीमाला मंदिर परिसराला युद्ध क्षेत्र बनवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न असल्याचा तीक्ष्ण आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी केला आहे.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे केरळ सरकार पालन करीत आहे. महिलांना प्रवेशासाठी सरकारने संरक्षणासह सर्वप्रकारच्या सुविधा पुरवल्या आहेत. त्यामुळे सरकार किंवा पोलीस प्रशासन भाविकांना अडवण्याचे प्रयत्न करीत नाही. त्यामुळे इथं कायदा सुव्यवस्था अपयशी ठरल्याचे म्हणता येणार नाही. उलट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शबरीमला मंदिर परिसराला युद्ध क्षेत्र बनवलं आहे.

दरम्यान, आंदोलक येथे येणाऱ्या लोकांची वाहने तपासत आहेत. महिला भाविकांवर तसेच माध्यम प्रतिनिधींवर हल्ले करीत आहेत. केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच या गोष्टी घडत आहेत. माध्यमांप्रती अशा स्वरुपाचा आक्रमक पवित्रा पहिल्यांदाच राज्यात पहायला मिळत आहे, असेही मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी म्हटले आहे.