शबरीमाला मंदिर वाद: प्रवेशाविरोधात भाजप, आरएसएसचा मोर्चा !

0

पंडालम्‌ : शबरीमाला मंदिरात परंपरा मोडीत काढत दोन महिलांनी प्रवेश केला. यावरून केरळमध्ये वाद पेटला आहे. हिंदू संघटनेकडून महिलांच्या मंदिर प्रवेशाला विरोध होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल केरल बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी झालेल्या हिंसाचारात एका आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज देखील भाजप व आरएसएसने मोर्चा काढला आहे.

काल आंदोलनकर्त्याच्या निधनाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्री विजयन यांनी या आंदोलनकर्त्याचा मृत्यू हृदय विकाराने झाल्याचे सांगितले आहे.