आकुर्डी : शब्दघन काव्यमंचच्यावतीने काव्य पुरस्काराचे आयोजन केले आहे. या पुरस्कारामध्ये राज्यस्तरीय शब्द प्रतिभा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक माधव राजगुरु, कवी अरविंद भुजबळ स्मृती पुरस्कार कवी कैलास भैरट, छावा काव्य पुरस्कार गझलकार दिनेश भोसले, कवयित्री माधुरी विधाटे, कवयित्री मानसी चिटणीस यांना तर इकबाल पुरस्कार (उर्दू शायरांसाठी) सय्यद आसिफ, काव्य रसिकता पुरस्कार अॅड. अंतरा देशपांडे, व्हॉटसअप काव्य स्पर्धा विजेते सन्मान मधु8ी ओव्हाळ, समृध्दी कर्वे, वर्षा बालगोपाल, माधुरी विधाटे, मानसी चिटणीस यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती काव्यमंचचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी दिली.
बीना स्कूलमध्ये सोहळा
आकुर्डी येथील बीना इंग्लिश मिडियम स्कूल येथे रविवारी दि. 10 जूनला सकाळी नऊ वाजता पुरस्कार समारंभ होणार आहे. यावेळी 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी बीना इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष इकबाल खान हे अध्यक्षस्थानी असणार आहे.यावेळी नवयुग साहित्य व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राज अहेरराव, साहित्य संवर्धन समितीचे कार्याध्यक्ष शोभा जोशी आदी उपस्थित राहणार.