शरद नगरात 9 जानेवारीपासून विवेकानंद व्याख्यानमाला

0

पिंपरी : शरद नगर (स्पाइन रोड लगत ) येथील स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने 9 ते 12 जानेवारी या दरम्यान व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे, अशी माहिती अध्यक्ष रामराजे बेंबडे यांनी पत्रकाद्वारे दिली. स्पाइन रोड लगत, शरदनगर ,फुले भाजी मंडई शेजारी रोज संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत कार्यक्रम होतील. दि. 9 : शिवव्याख्याते अशोक बांगर (शिवचरित्र व धर्मवाद), दि. 10 : डॉ. शिल्पा महामुनी (इच्छापत्र एक काळाची गरज), दि. 11 : अर्चना भोर (गरज जिजाऊंच्या संस्कारांची व शिवरायांच्या विचारांची), दि. 12 : सच्चिदानंद शेवडे (नरेंद्र ते स्वामी विवेकानंद) यांची व्याख्याने होतील.