मुंबई । मुंबई, ठाण्यासह दहा महानगरपालिका आणि 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यासाठीचे मतदान झाले. यात सर्वाचे लक्ष लागले आहे तेे मुंबई महानगरपालिकेकडे. यापेक्षाही सर्वाचे लक्ष वेधले गेले ते म्हणजे शरद पवार व त्यांची नात रेवती हिने कोणाला मतदान केले हे जरी गुलदस्त्यात असले तरी यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
वॉर्ड क्रमांक 214 मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हे मतदानासाठी सोबत आले. सकाळी साडेनऊच्या सुमारास शरद पवार व रेवती यांनी महालक्ष्मी येथे बुथ क्रमांक 11 वर मतदानाचा हक्क बजावला. रेवती हिने प्रथमच मतदान केले. मतदान केले असले तरी शरद पवार व रेवती यांनी कोणत्या पक्षाला मतदान केले असा प्रश्न निर्माण झाला. कारण या वॉर्डात राष्ट्रवादीने उमेदवारच नसल्याने कोणत्या पक्षाला मतदान करणार याबाबत आता चर्चा सुरू झाली होती. वॉर्ड क्रमांक 214 मध्ये शिवसेनेकडून अरविंद बने, भाजपकडून अजय पाटील, काँग्रेसचे कौशिक शहा आणि मनसेकडून धनराज नाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत.