शरद पवार ‘डिफेंडर’, ते सरकारचा नाकर्तेपणा झाकताय

0

मुंबई: राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. ऐन काढणी-कापणीला आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान सरकारकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी होत आहे. आज सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस एकाच वेळी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरहून दौरा सुरु केला आहे तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीला आहे.

दरम्यान पाहणी दौऱ्यावर असतानांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी या वयातही शरद पवार यांना राज्यात फिरावे लागत आहे. शरद पवार हे सरकारसाठी ‘डिफेंडर’ म्हणून काम करत आहे. सरकारचा नाकर्तेपणा उघड होऊ नये यासाठी शरद पवार फिरत आहेत असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नुकसानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. परंतु राज्य सरकारने केंद्राच्या मदतीची वाट न पाहता मदत जाहीर करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कालपासून मराठवाड्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज सोमवार त्यांचा दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. काल त्यांनी उस्मानाबादचा दौरा केला.