चाळीसगाव : माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी १० ते ३ या वेळात बापजी रुग्णालय हिरापूर रोड चाळीसगाव येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यात तज्ञ स्त्री रोग तज्ञ, अस्थीरोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ, त्वचा रोग तज्ञ, आयुर्वेद तज्ञ, होमिओपॅथी तज्ञ, डॉक्टरांकडून महिलांची सर्व प्रकारची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. औषधांचे वाटप देखील होणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सोनल साळुंखे यांनी केले आहे.