शशांक मनोहर आयसीसीच्या चेअरमनपदी कायम राहणार

0

नवी दिल्ली । आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी तडकाफडकी 15 मार्च रोजी चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता. आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.या निर्णयामुळे मोठी खळबळ उडली होती. या राजीनामे देण्यामागे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते.राजीनामा दिल्यानंतर शशांक मनोहर यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. यापुढेही ते आयसीसीच्या चेअरमनपदी कायम राहतील. शंशाक मनोहर यांच्या या निर्णयानंतर आयसीसीच्या संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. एप्रिलमधल्या वार्षिक परिषदेत आयसीसीच्या आर्थिक मॉडेलची पुनर्रचना करण्यात येणार आहे.

वारस निवडणार एप्रिल महिन्यात : आयसीसीच्या बैठकीत मनोहर यांनीच अध्यक्षपदावर कायम राहण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला होता. आयसीसी बोर्डाने दाखवलेल्या विश्वासाचा आदर राखून मनोहर यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा आपला निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे. मे 2016 मध्ये मनोहर यांची आयसीसीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली होती. शशांक मनोहर यांनी राजीनामा दिल्यानंतर तो मागे घ्यावा यासाठी मागे घ्यावा यासाठी आयसीसीकडून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडे विनंती करण्यात आली होती. परिषदेच्या विनंतीला मान देऊन अखेर मनोहर यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याचे सांगितले आहे, असे आयसीसीने म्हटले आहे.आयसीसीची वार्षिक परिषद एप्रिलमध्ये होणार आहे. त्यात मनोहर यांच्या वारसदाराची निवड करण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रशासन आणि आर्थिक पुनर्रचनेतील बदल जोवर पूर्णत्वास येत नाहीत तोवर आपण अध्यक्षपदावर कायम राहावे, अशी विनंती आयसीसीने मनोहर यांना केली असल्याचे आयसीसीने म्हटले आहे. दरम्यान, मनोहर यांनी वैयिक्तक कारणामुळे राजीनामा दिल्याचे सांगितले जात होते.

राजीनाम्या कारणे?
आयसीसीने अमेरिकन क्रिकेट बोर्डाला नोटीस दिली होती.ती ही अनिमियते बद्दल नोटीस दिली.यावर अमेरिकन क्रिकेट बोर्डाने त्यावर बीसीसीआयचे उदाहरण दिले की त्याच्यामध्ये किती घोळ सुरू आहे.त्यावर तुम्ही कारवाई करत नाही.असे उदाहरण दिले होते.