शहादा । येथील पालिकेचे ज्येष्ठ शिक्षक शशिकांत कुवर यांची महानगरपालिका शिक्षक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघटनेच्या नंदुरबार येथे नंदुरबार जिल्हास्तरीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चा सत्राच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य अध्यक्ष तथा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अर्जुन कोळी यांची उपस्थिती होती. यावेळी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या विषयावर चर्चा करण्यात आली. एक दिवशीय चर्चा सत्रात शैक्षणिक गुणवत्ता विकासाचा दृष्टीने आगामी काळात विविध शैक्षणिक योजन राबविण्याविषयी विचार विनिमय करण्यात आले. यावेळी उपस्थितानी सर्व सन्मतीने संघटनेचा जिल्हा कार्यकारिणी उपाध्यक्षपदी येथील नगरपालिका शाळा क्र . ७ चे मुख्याध्यापक शशिकांत ओंकार कुवर यांची निवड केली. त्यांच्या निवडीबाबत मित्र परिवाराकडुन त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.