पेशावर : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या निधनानंतर त्यांना पाकिस्तानातही श्रद्धांजली वाहण्यात आली. पेशावरमधील त्यांच्या वडिलोपार्जित घराबाहेर मेणबत्या पेटवून चाहत्यांनी आंदराजली वाहिली. पेशावरमधील खैबर-पख्तुनख्वा प्रांतामधील धोकी नालबंदी गावात कपूर कुटुंबियांची वडिलोपार्जित हवेली असून शशी कपूर यांचे आजोबा दीवान बाशेश्वरनाथ सिंह कपूर यांनी 20व्या शतकात ती बांधली आहे. याच हवेलीच्या आवारात खैबर-पख्तुनख्वा कल्चरल हेरिटेज काउन्सिल आणि पाकमधील हिंदी सिनेमाच्या चाहत्यांनी शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.