नवी दिल्ली-सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने काँग्रेस नेते शशी शरुर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यासाठी थरुर यांना १ लाख रुपयांचे जामीनपत्र भरावे लागणार आहे. थिरुअनंतपुरमचे खासदार असलेल्या थरुर यांना यापूर्वी आरोपी म्हणून समन्स बजावण्यात आले आहे. विशेष न्यायमुर्ती अरविंद कुमार यांनी बुधवारी सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर गुरुवारपर्यंत निर्णय राखून ठेवला होता. पोलिसांच्यावतीने सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी कोर्टात शरुर यांच्या जामिनाच्या मागणीला विरोध केला होता.
Sunanda Pushkar death case: Shashi Tharoor will have to furnish a bail bond of Rs 1 lakh. He has been granted anticipatory bail by Delhi's Patiala House Court.
— ANI (@ANI) July 5, 2018
आरोपी असलेले थरुर जामिनाचा फायदा घेऊन देशातून पलायन करु शकतात. तर दुसरीकडे थरुर यांच्यावतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात बाजू मांडली. त्यांनी कोर्टासमोर सांगितले की, आरोपी एक खासदार आहेत. तसेच या प्रकरणात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना अटकेपासून दिलासा मिळायलाच हवा. काँग्रेस नेते असलेले थरुर यांना अटक व्हावी यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, आरोपपत्र दाखल झाले आहे. तसेच थरुर यांची चौकशी पूर्ण झाली असून अटक करुन त्यांची आणखी चौकशी करण्याची गरज नाही, असे एसआयटीने स्पष्टपणे म्हटल्याचे सिब्बल यांनी सांगितले.
कोर्टाने ५ जून रोजी थरुर यांना समन्स पाठवून ७ जुलै रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितले होते. आदेश दिल्यानंतर कोर्टाने थरुर यांच्याविरोधात कारवाई करण्यास पुरेसा आधार असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर थरुर यांना कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. दरम्यान, थरुर यांनी कोर्टाच्या निर्णयामुळे खूष होण्याची गरज नाही. कारण, ते सध्या तिहार जेलमध्ये नसले तरी ते सोनिया गांधी आणि राहुल गांधींसोबत बसू शकतात कारण ते देखील जामीनावर बाहेर आलेले आरोपी आहेत, अशा शब्दांत भाजपा नेते आणि ज्येष्ठ विधीज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांनी कोर्टाच्या या निर्णयानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.