अडीच कोटींच्या बिलाबाबतही आक्षेप; जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
भुसावळ– प्रभारी लेखापाल अख्तरखान खुशनूरखान यांना बिलांवर स्वाक्षर्या करण्याचे अधिकार नसताना त्यांनी काढलेले अडीच कोटींचे बिल रद्द करून त्यांच्यावर कारवाई करावी, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर व नगराध्यक्ष रमण देविदास भोळेदेखील या कृत्यात सहभागी असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच शहरवासीयांचे सत्ताधार्यांच्या दुर्लक्षामुळे होणारे पाण्याचे हाल थांबवावेत, सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांचा पाणीविक्रीचा गोरखधंदा थांबवावा, शहरातील अस्वच्छता दूर करावी यासह अन्य मागण्यांसाठी जनआधारच्या नगरसेवकांनी बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास सुरुवात केली आहे. निवेदनाची प्रत प्रांताधिकारी प्रशासनास देण्यात आली.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
जनआधारचे गटनेता उल्हास भीमराव पगारे, उपगटनेता शे.जाकीर शे.सरदार, शे.सलीम शे.नादर, दुर्गेश नारायण ठाकूर, अॅड.तुषार सुधाकर पाटील, राहुल कैलास बोरसे, संगीता प्रदीप देशमुख, नीलिमा सचिन पाटील, वैशाली चावदस पाटील, शबानाबी सिकंदर खान, पुष्पा जगन सोनवणे, नूरजहाँ आशिक खान, जायराबी शेख शब्बीर, साधना रवींद्र भालेराव, इकबाल सरदार बागवान, संतोष त्र्यंबक चौधरी, कविता अशोक चौधरी, मिनाक्षी नितीन धांडे, रवींद्र बळीराम सपकाळे, अरुणा सुरेश सुरवाडे, प्रदीप दिनकर देशमुख, सचिन भास्कर पाटील, ललीत काशिनाथ मराठे, सिकंदरखान इस्माईलखान, ईम्तियाज शेख शब्बीर, फारुख फकिरा गवळी आदींच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.