शहराच्या विकासासाठी मनपात भाजपची सत्ता आवश्यक-आ.गोटे

0

धुळे : शहराचा विकास करायचा असेल तर महापालिकेची सत्ता मिळवावी लागेल, त्यासाठी लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल धुळयात आता भाजपच्या बाजूने वातावरण निर्माण झाले असून मनपा निवडणूकीत यश आपलेच आहे, असे प्रतिपादन आमदार अनिल गोटे यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक कोतवाल भवन येथे दुपारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीकडे भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. व्यासपीठावर भिमसिंग राजपूत, विजय अग्रवाल, तेजस गोटे, प्रतिभा चौधरी, वैभवी दुसाणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलतांना आमदार अनिल गोटे म्हणाले की, आपल्या कार्यकर्त्यांची दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या विरोधकांची चिंता वाढवत आहे. परंतु चिंता न करता आम्ही केलेलं काम हाच आमचा पक्ष, अनिल गोटे हाच आमचा पक्ष अशी भुमिका जनतेसमोर मांडावी, असे आवाहन आमदार गोटे यांनी केले यावेळी केले.