शहरातील दोन घरांच्या अतिक्रमणावर हातोडा

0

धुळे । महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कारावाईत शुक्रवारी शहरातील दोन अतिक्रमित घरांवर हातोडा मारण्यात आला. दरम्यान यावेळी वाद होवू नये म्हणून पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी 11 वाजता साक्री रोडवरील सिंचन भवनमागे असलेल्या दोन निवासी घरांवर आज मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने हातोडा मारला. यापूर्वी ह्या घरमालकांना स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस बजावण्यात आल्याचे समजते.

किरकोळ वाद
किरकोळ वाद झाला मात्र पोलीसांच्या मदतीने निवासी घरे काढण्यात आली. मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकात अभियंता कैलास शिंदे,कर्मचारी कमलेश सोनवणे, सुनिल वर्पे, भामरे आदींचा समावेश होता.

नोटीस बजावली होती
अतिक्रमणात उध्वस्त झालेल्या दोन घरात ओंकार भील आणि राजू गेंदा मोरे यांची निवासस्थाने होती. ती अतिक्रमीत ठरल्याने मनपा कर्मचार्‍यांनी ती उखडून काढली. अतिक्रमण काढलेल्या दोन घरांपैकी एक घर मात्र मनपाच्या कर्मचार्‍याचेच असल्याचे सांगण्यात आले.