चाळीसगाव। मे मे महिना हा उष्णतेसाठी अतिशय हिटचा असल्यामुळे आज जिल्ह्याचे तापमान 44 अंशाचा टप्पा पार केला आहे. त्यातच कडाक्याच्या उन्हात मोठ्याप्रमाणावर विज मंडळाकडून भारनियमन होत असल्याने नागरीक व अबाल वृद्धांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळातर्फे शहरातील 132 केव्ही (11 केव्ही डेअरी परिसर) 33/11 केव्ही सी.टी.एम. (11 केव्ही घाट रोड, हुडको परिसर) 132 केव्ही चाळीसगाव (11 केव्ही शहर आणि सी.टी.एम) 33/11 केव्ही एम.आय.डी.सी (11 केव्ही जुने विमानतळ परिसर) या भागात भारनियमन करण्यात येत असून नागरिकांचे आणि व्यापारी बांधवाचे हाल होत असून त्या संदर्भात कुठलीही पुर्वकल्पना दिली गेली नाही तसेच वीज वितरण महामंडळाच्या वतीने नागरिकांना वेठीस धरले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांची उपस्थिती
या प्रसंगी शहराध्यक्ष शाम देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान पाटील, शेखर देशमुख, जगदीश चौधरी, सुर्यकांत ठाकुर, दिपक पाटील, फकीरा बेग, पं.स सदस्य अजय पाटील, सदाशिव गवळी, किशोर पाटील, बाजीराव दौंड, छगन पाटील, युवक शहराध्यक्ष अमोल चौधरी, गौतम जाधव, युवक उपाध्यक्ष निरज अजबे, विद्यार्थी शहराध्यक्ष शिवसागर पाटील, लक्ष्मीकांत चौधरी, प्रकाश पाटील, ऋषीकेश देशमुख, चंद्रराज पाटील, अजय पाटील, हृदय देशमुख, शुभम पवार, एजाज शेख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या संदर्भात स्वप्नील कोतकर यांच्याकडे शहरातील काही व्यापारी बांधवांनी समस्या कथन केलेल्या होत्या. त्या समस्यांचा देखील पाढा, यावेळी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कोतकर यांनी सांगितला.
आंदोलन करण्याचा इशारा
पुढील महीन्यात येणारा रमजान महीना त्यात महाविद्यालयीन परिक्षा लक्षात घेता विद्यार्थ्यांचे होत असलेले हाल,वीज ग्राहकांना वीजेसंबंधी भेडसावत असलेले प्रश्न, भारनियमन तसेच वीज ग्राहकांना वेठीस धरण्यात येत आहे. नगरसेवक रामचंद्र जाधव, सुर्यकांत ठाकूर, जगदीश चौधरी, दिपक पाटील यांनी अधिकार्यांना धारेवर धरत समस्यांची सोडवणूक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी वितरण मंडळाचे उप कार्यकारी अभियंता एस.बी.जोशी यांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.