शहरातील विकासकामांना निधी उपलब्ध करून द्या

0

नंदुरबार । शहरासाठी विकास कामांना निधी देण्यात यावा अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. फडणवीस यांची भेट घेऊन निधीचे निवेदन सादर केले. त्यात महटले आहे की, नवनाथ नगर व मोठा मारुती मंदिर परिसरातुन गटाराचे पाणी रोज प्रचंड प्रमाणात वाहून शहराच्या मुख्य बाजारपेठत येतं, या समस्येवर अद्यावत भूमिगत गटार रस्ते व विज खांब यासाठी सर्वेक्षण करून निधी मंजूर करावा. नंदुरबार शहरात वाढत्या रहदारीच्या समस्येंवर अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. स्वामी समर्थ मंदिराजवळ बगीच्यासाठी निधी मिळावा अशी मागणी केली.

समिती स्थापन करा
भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने हजारो घरे शहरात आहे ,त्यांना दंड व शुल्क आकारून भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी आदेश द्यावा. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या प्रभाग क्र. 1,9,11,14,16,17,18 या प्रभागात विकास कामांसाठी दहा लाखांचा निधी मिळावा. नंदुरबार नगरपालिकेच्या मालमत्ता कर खूपच जास्त असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे यावर नगरसेवक व जिल्हाधिकारी यांची समिती स्थापन करून सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी आदेश पारित करावा. शहरात सी.सी.टीव्ही साठी जिल्हा नियोजन समिति मार्फत मंजूर निधीत अजून निधी द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी नगरसेवकांसोबत खा. डॉ.हिना गावित, आ.डॉ.विजयकुमार गावीत, आ.शीरीष चौधरी , ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, उद्योजक प्रा.डॉ. रवींद्र चौधरी, विरोधी पक्ष नेता चारूदत कळवणकर,आनंद बाबुराव माळी, गौरव चौधरी,प्रशांत चौधरी,नीलेश पाडवी, नीलेश माळी,संतोष वसईकर, लक्ष्मण माळी,सौ कल्पना चौधरी, संगीता सोनवणे,अँड.धनराज गवळी, प्रकाश चौधरी, संजय शहा,नरेंद्र माळी,गजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते,