पिंपरी चिंचवड : शहरातील विविध विकास विषयक कामांसाठी सुमारे 6 कोटी 66 लाख 42 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात मंगळवारी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. यामध्ये, प्रभाग क्र.12 मधील काळभोर नगर शाळा क्र.2/2 येथील सिमा भिंतीची उंची वाढविणे, पेव्हर ब्लॉक बसविणे यासह देखभालीची कामे करण्याकामी सुमारे 52 लाख 16 हजार रुपयांच्या खर्चास मंजूरी मिळाल्याची माहिती विलास मढेगिरी यांनी दिली.
जलनि:सारण व्यवस्थेसाठी 50 लाख 87 हजार
हे देखील वाचा
प्रभाग क्र. 13 राहुलनगर आणि श्रमिकनगर मधील जुन्या जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याकामी सुमारे 50 लाख 87 हजार रुपयांच्या खर्चासही या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.5 मधील शास्त्री चौक, जय महाराष्ट्र चौक, हुतात्मा चौक परिसरात मलवाहिनीची सुधारणा यासाठी 31 लाख 87 हजार रुपयांचा निधी खर्च होणार आहे. प्रभाग क्र. 30 मधील कासारवाडी, केशवनगर, हिराबाई लांडगे झोपडपट्टी तसेच उर्वरित परिसरातील आवश्यक त्या ठिकाणी जलनि:सारण नलिकांमध्ये सुधारणा करण्यात येणार असून 33 लाख 19 हजार रुपये यासाठी खर्ची होणार आहेत.
रस्ते रुंदीकरणासाठी 2 कोटी 65 लाख..
क प्रभाग अंतर्गत येणार्या जुन्या मलनि:सारण नलिका बदलणेकामी येणार्या सुमारे 31 लाख 92 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. महानगरपालिकेच्या विकास योजना प्रस्तावानुसार संरक्षण विभागाकडून विविध ठिकाणच्या रस्ता रूंदीकरण तसेच रस्त्याच्या जागा हस्तांतरीत करून घेण्याकरिता संरक्षण विभागास सुमारे 2 कोटी 65 लाख 48 हजार रूपये देण्यास स्थायी समिती बैठकीत मान्यता मिळाल्याचेही मढेगिरी यांनी सांगितले.