शहरातील विद्यार्थी करणार नागरिकांचे प्रबोधन

0
निबंध, चित्रकला स्पर्धांचे इसिएकडून आयोजन
पिंपरी : इन्हॉयरमेंट कन्झर्वेशन असोसिशनच्यावतीने पिंपरी-चिंचवड मनपा शाळांच्या सोबत स्वच्छ भारत जनजागरण फेरी, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी 635 शाळांमधून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वच्छ भारत जनजागरणबाबत लाखो विद्यार्थी शिस्तबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचे नियोजन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्वच्छ भारत विभाग प्रमुख आणि अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 28 सप्टेंबरपासून शाळांमध्ये रोज स्वच्छता शपथ घेण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबर पर्यंत मुलांना रोजच्या परिपाठात ही शपथ घेतली जाणार आहे. निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे इसिए अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले.
थेरगाव व काळेवाडी परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक 29 सप्टेंबर रोजी थेरगाव शाळेच्या पटांगणावर एकत्र जमा होणार आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यावेळी उपस्थित रहाणार असून या स्वच्छता जनजागरण फेरीमध्ये 3500 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. चिंचवड परिसरातील 5000 विद्यार्थी 1 ऑक्टोबर रोजी चापेकर पुलाखाली एकत्र जमा होऊन जनजागर फेरी काढणार आहेत. तर यमुनानगर परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी दुपारी 1 वा. मीनाताई ठाकरे पटांगणावर एकत्र जमून फेरी काढणार आहेत. प्रत्येक शाळा जनजागरण फेरीच्या वेळी शाळेचे ढोल-लेझीम पथक घेऊन सहभागी होणार आहेत. शहरातील नागरिकांनी शहर स्वच्छतेबाबत अनुकूल धोरण राबवावे उपक्रम राबविला जात आहे. पर्यावरण पुरक गणेशोत्वानंतर आता अंदाजे 3 लाख विद्यार्थी यामध्ये समाविष्ट होत आहेत.