पुणे:– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 70 दिवसापासून लॉक डाऊन आहे. ज्या भागात संसर्ग झाला आहे. असे भाग वगळता अन्य भागातील एरव्ही दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी पुणे व्यापारी महासंघाने पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे मागणी केली आहे.
व्यापाऱ्यांची परिस्थिती ज्ञात असल्याने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले. येत्या 8 जून पासून राज्यातील बहुतांश भाग खुला करण्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात आतापर्यंत दुकाने बंद होती. त्या मुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे व्यावसायिकांनी आयुक्तांना सांगितले.
शहरात 17 मार्च पासून दुकाने बंद आहे. शहरातील मध्यवर्ती पेठा गुरुवार, शुक्रवार, कसबा, नाना, भवानी, रविवार, बुधवार तसेच शिवाजी रस्ता, मंगळवार पेठा या इलेक्ट्रिक, भांडी, टिंबर प्लायवूड, आयर्न स्टील, कापड, सोने, चांदी, अगरबत्ती, खेळणी, वेल्डिंग, जुने वाहन विक्रीच्या घाऊक बाजारपेठ आहे. या ठिकाणाहून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्ये मालाची विक्री होत असल्याचे सांगितले.
या बंद मुळे पुरवठा साखळी खंडित झाली असून व्यवहार ठप्प झाले आहे. त्या मुळे व्यापारी हवालदिल झाले आहे. शहरातील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येतील तेवढीच इमारत, घर सील करण्याची मागणी पुणे व्यापारी महासंघाने केली आहे.