शहरातील 12 दुकाने सील मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांची कारवाई

0

जळगाव– राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची लक्षणीय वाढ होवू लागली आहे. त्यामुळे पून्हा 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त बंदचे आदेश आहेत. तरीही देखील काही व्यवसायिक शटर अर्धे उघडून व्यवसाय करीत असताना निदर्शनास आल्यामुळे आणि नियमांचे उल्लंघन के ल्यामुळे मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व्यावसायिकांवर कारवाई करत 12 दुकाने सील केले. या कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याचे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत असतानाही काही व्यवसायिकांकडून नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. काही दिवसापूर्वी मनपा प्रशासनाने दाणाबाजारातील सहा दुकाने सील केले होते. तसेच काही जणांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथकाने शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सुभाष चौक, सराफ बाजार,फुले मार्केट परिसरात पाहणी करत असताना काही व्यावसायिक शटर अर्धे उघडून व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे 12 दुकाने सीलची कारवाई करण्यात आली.

गुन्हा दाखल करणार
कोरोनामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. वारंवार सूचना दिल्यानंतरही नियमांचे पालन होतांना दिसून येत नाही. शहरात पाहणी केली असता काही व्यावसायिक ांची प्रतिष्ठाने खुली दिसून आलीत. त्यामुळे सीलची कारवाई केली असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
-संतोष वाहुळे
उपायुक्त,मनपा