शहरातून संविधान सभा जागर रॅली उत्साहात

0

जळगाव । भारताचे सार्वभौम असलेले संविधानाच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी सामान्य नागरिकांवर असल्याची भावना संविधान सभा जागर रॅलीच्या निमित्त उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला संविधान प्रदान केल्याच्या आजच्या 68व्या स्मृतिदिनानिमित्त संविधान सभा व संविधान जागर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

संविधान सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, माजी मंत्री गुलाबराव देवकर,ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्रअण्णा पाटील, अँड.राजेश झाल्टे, माजी उपमहापौर करीम सालार, शेतकरी सुकाणू समितीचे सचिन धांडे, जळगाव फर्स्टचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जनसंग्राम बहुजन लोकमंचचे अध्यक्ष विवेक ठाकरे, परिवर्तनचे शंभू पाटील, गनी मेनन,शिवचरण ढंढोरे, ईश्‍वर मोरे, भानुदास विसावे, बारा बलुतेदार महासंघाचे चंद्रकांत सोनवणे, नाभिक महामंडळाचे किशोर सूर्यवंशी, प्रा.चंद्रमनी लभाणे, दत्तात्रय तायडे, दिलीप सपकाळे, नगरसेवक राजू मोरे, संजय सपकाळे, भारत सोनवणे, किरण वाघ, बाबुराव वाघ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

शहरातून काढली भव्य संविधान रॅली
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्य संविधान रॅली काढण्यात आली. नेहरू पुतळा, टॉवर चौक, चौबे मार्केट, सुभाष चौक, राजकमल चौक, चित्रा चौक या मार्गे रॅली निघून शेवटी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समारोप सभा घेण्यात आली. समारोप सभेला आमदार राजुमामा भोळे यांनी मार्गदर्शन केले.जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधीकारी यानी कार्यक्रमाच्या सुरवातीपासून तर संपूर्ण रॅलीत उपस्थित राहून सविधाना प्रति प्रशासन सजग असुन सर्वसामान्याचे प्रशासन असल्याचे दाखवून दिले.