शहरात अमृत योजनेअंतर्गत 15 टक्के पाईपलाईन पूर्ण

0

जळगाव : शहरात विविध भागांमध्ये अमृत योजनेअंतर्गत पाईप लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या पाईप लाईनव्दारे प्रत्येक घराला एक नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. यात ज्या घरांमध्ये एकापेक्षा जास्त नळ संयोजन असतील अशा घरांना एकच नळ संयोजन दिले जाणार आहे. यात काहींनी घरगुती वापरासाठी कर्मशिअल कनेक्शन घेतले आहे किंवा कर्मशिअल वापरासाठी घरगुती कनेक्शन घेतले आहे अशा नळ संयोजनांचा शोध घेवून त्यांनाही एकच कनेक्शन देण्यात येणार आहे.

सात नवीन जलकुंभ
अमृत योजनेअंतर्गत सुरू झालेले पाईप टाकण्याचे काम 15 टक्के पुर्ण झाले आहे. हे काम आजपर्यंत 25 टक्के पुर्ण होणे अपेक्षीत होते. परंतु, काही तांत्रिक कारणांमुळे पाईप टाकण्याचे काम हे उशीराने सुरू झाले होते. हे काम पावसाळ्यातही सुरू राहणार आहे. आजपर्यंत शहरात 67.85 किमीचे पाईप टाकण्याचे काम पुर्ण झाले आहे. शहरात 7 नवीन जलकुंभ उभारण्यात येणार आहे. काल शांतीनिकेतन येथील ओपन स्पेशमध्ये अतिक्रमीत बांधकाम अतिक्रमण विभागाकडून पाडण्यात आले आहे. येथे 30 लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात येणार आहे. याच प्रमाण इतर भागांमध्ये अडचणी येत असल्याने कामास उशीर झाल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले. ज्या भागात पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण होते आहे त्या पाईप लाईनची लगेच स्टेस्टींग करण्यात येत आहे. यासाठी पाईपमध्ये पाणी भरून विशिष्ट प्रेसर देवून 10 मिनींटे पाणी पाईपमध्ये ठेवण्यात येत आहे.