जळगाव । आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसह आदिवासी अधिकारासाठी आदिवासी एकता परीषदतर्फे एक दिवस समाजासाठी संपूर्ण आयुष्य तुमच्यसाठी याच्याअंतर्गत महामोर्चा काढण्यात आला. मोर्चांची सुरूवात शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातून झाली. मोर्चां शास्त्री टावर चौक, नेहरू चौक, कोर्ट चौक, स्वांतत्र्य चौक मार्गांने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या नंतर अधिवासींवर होणारे अत्याचार थांबविण्याची मागणीसह आदिवासांच्या आदिवासी वसतीगृहातील होणारे संशयास्पद मृत्यू, आदिवासी आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थींनीवर अत्याचार करणार्या नराधामांना फाशीची शिक्षा द्यावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. यावेळी सुनील गायकवाड, राजु तडवी, एम. बी. तडवी, डॉ. चंद्रकांत बारेला, पन्नालाल माळवी, सुधाकर वाघ, अमित तडवी, रूपसिंग विसावे, राजु तडवी, आदी उपस्थित होते.
महिलांचा लाक्षणिक सहभाग
जिल्ह्याभरातून शेकडो आदिवासी बांधव सकाळपासूनच शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात एकत्र यायला सुरूवात झाली होती. यानंतर दुपारी 10 वाजता सुरू झालेल्या महामोर्चांत महिलांचा लक्षणीय समावेश होता. महामोर्चांत सहभागींनी आपल्या हातात आदिवासींचे शोषण बंद करा, बंद करा, आदिवासींना न्याय द्या आदी फलक आपल्या हातात घेतले होते.
पदोन्नती राखणार्यांची चौकशी करा
आदिवासींच्या शिष्यवृत्ती घोटाळा, आदिवासींचे स्थलांतर, जल-जमिन-जंगल, 5 व्या अनुसूचीचे अधिकार, दफनभूमीची जागा तसेच शासकीय सेवेत असलेल्या आदिवासी कर्मचार्यांची पदोन्नती रोखून ठेवणार्या अधिकार्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत होती. आदिवासीबांधवांनी शिस्तबध्द पध्दतीने
मोर्चोत सहभाग झाले होते.
विविध संघटनांचा सहभाग
या महामोर्चेंत आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच, आदिवासी सेवा मंडळ(आसेम), आदिवासी पावरा विकास परिषद, राष्ट्रीय आदिवासी विकास परीषद, आदिवासी एकता विद्यार्थी परीषद, एकलव्य भिल्ल समाज संघटना, पारधी विकास महासंघ आदी संघटनांनी सहभाग घेतला. महामोर्चांद्वारा जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात आदिवास आश्रम शाळेत होणारे अन्याय-अत्याचार थांबविणे, आदिवासी वसतीगृहात मुबारक तडवी यांच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी, मुबारक तडवीच्या मृत्यू तपासअधिकारी, प्रकल्पअधिकारी व कर्मचार्यांनी कर्तव्यात कसून केल्याबद्दल त्यांना त्वरीत बडतर्फे करून त्यांच्यावर अॅटॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात येवून मुबारत तडवीच्या कुटुबियांना 5 लाखाची मदत व कुटुंबातील सदस्याला नोकरी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पारंपरिक वेषात महामोर्चात सहभागी
आदिवासी बांधव या महामोर्चांत सहभागी होण्यासाठी पारंपारिक वेषांत आले होते. आदिवासींच्या वापरातील शेतजमिन, वनजमिन, गायरान, गावठाण जमिनी नियमीत करून त्यांचे नाव करण्यात यावी. तसेच समाजकल्याण विभागाच्या योजनेनुसार आहे त्या जागांवरच घरकुल बांधुन देण्यात यावे. पंडित दीन दयाल उपाध्याय योजनेचे नाव बदलवून धतरी आबा बिरसा मुंडा योजना करण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकर्यांनी केली आहे. तसेच 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अॅट्रॉसिटीचा कायदा कडक करण्यात यावा व खोट्या क्रॉसकेस दाखल न करता आदिवासींच्या केसेस जलद गतीने फास्टट्रॅकने चालविण्यात याव्या आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.