शहरात कडकोट पोलिस बंदोबस्त

0

पुणे । स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. गर्दीची ठिकाणे, लॉज, हॉटेल्स यांची तपासणी करण्यात येत असून, शहरांच्या प्रवेशाच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे.

मंगळवारी स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान पुण्याला दहशतवादी कारवायांचा धोका व घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांकडून स्वातंत्र्यदिन शांततेने आणि सुरक्षितपणे साजरा व्हावा यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दोन ते तीन दिवस आधीपासून शहरातील लॉज, हॉटेल यांची तपासणी सुरू केली आहे. बस स्थानक, रेल्वेस्टेशन येथील तपासणी केली आहे. सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करून बंदोबस्त तैनात केला आहे.