जळगाव । जाणता राजा प्रतिष्ठान व जिल्हा कुस्ती तालिम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराणा प्रताप सिंह यांच्या 477 व्या जयंती निम्मित कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुस्ती स्पर्धा 28 मे रोजी दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत काव्यरत्नावली चौकातील जाणता राजा व्यायाम शाळा येथे होणार आहे. जिल्ह्यातील मान्यवरांसह तीन वेळेस महाराष्ट्र केसरी मिळविण्याचा बहुमान पटकविणारे विजय चौधरी व दंगलफेम पहिलवान सुरज चव्हाण यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
खान्देशातून पहिलवान सहभागी होणार
अपार मेहनतीच्या कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजीन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितलेे. संपूर्ण खान्देशातून या स्पर्धेत पहिलवान सहभागी होणार आहेत. जास्तीत जास्त जळगावकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी महापौर किशोर पाटील , जिल्हा कुस्ती तालिम संघाचे अध्यक्ष प्रा. नारायण खडके व पदाधिकार्यांनी केले आहे.