पुणे: शहरात चोरट्यांनी उच्छांद घातला असून, दोन दिवसात चाळीस लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. कोरेगाव पार्कमध्ये भरदिवसा घरफोडीकरुन लोखंडी कपाटातून इलेक्ट्रीक तिजोरी पळवली. तर, शहरात या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत चोरटे लाखोंचा माल लंपास करत आहेत. मात्र, या घटना रोखण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
वासुदेव लक्ष्मणदास मेगानी (वय 43) यांच्या कोरेगांव पार्क येथील घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. मेगानी जशनमहल कॉ. सोसायटीमध्ये फ्लॅट आहे. त्यांचा पाण्याचे पंप विकण्याचा व्यावसाय असून पत्नीचे कॉम्प परिसरात फॅशन स्टुडीओचे गारमेंट्स व्यावसाय सुरु केला आहे. मेगानी यांनी सुरक्षतेची पुर्ण काळजी घेतली आहे. पत्नीने सुरु केलेल्या दुकानाचे गुरुवारी उद्घाटन होते. त्यामुळे कुटूंबिय सकाळी 11 वाजता घराला कुलूप लावून उद्घाटनासाठी कॉम्पात आले होते. त्यावेळी चोरट्यांनी दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. दोन्ही लोखंडी कपाट उचकटले. एका कपाटात बसवण्यात आलेली लोखंडी तिजोरी चोरट्यांनी काढून नेली. त्यामधील तेरा लाख 80 हजार रुपयांचे सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास केले आहेत. नातेवाईक आराम करण्यासाठी दुपारी साडे चार वाजता घरी आले. त्यांवेळी हा प्रकार समोर आला. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुश्रृंगी परिसरात सदाशिव बंजन (वय 72) यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. बंजन यांची इंजिन मशिनचे टुल्स बनवण्याची फॅकटरी आहे. तीन दिवसांपुर्वी ते मेव्हण्याचा तेरावामुळे कर्नाटक येथे गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारत 70 तोळे सोने, 6 किलो चांदी तसेच दिड लाख रुपये रोख चोरुन नेले आहेत. शुक्रवारी ही घटना उघड झाली. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस तपास करत आहेत.
नर्हेमध्ये बाबुराव सावंत (वय 43), समाधान शिंदे, प्रशांत पाटील (वय 47) यांच्या घरी चोरी झाली आहे. रुनेवरा अॅनेक्स सोसायटीतील बंद फ्लॅट फोडून सावंत यांच्या फ्लॅटमधून एक लाख 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली, तर शिंदे यांच्या फ्लॅटमधून एक लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. पाटील यांच्या फ्लॅट चोरट्यानी 34 हजार 800 रुपयांचे माल चोरीला गेला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कात्रज संदीप दाते (वय 40) यांचे श्रीराम सहकारी निवास सोसायटीमधून चोरट्यांनी कपाटातील दोन अमेरिकन डॉलर व इतर ऐवज असा 29 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तर, विमानतळ येथील केदार सेनगावकर (वय 67) यांचा बंद फ्लॅट फोडून 67 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. बाणेर येथील अलका पांडे (वय 65) यांचा घरामधून चोरट्यांनी एक लाख 8 हजार रुपयांची घरफोडी केली. पांडे या अमेरिकेला गेल्या होत्या. त्यावेळी घरफोडी झाली. तर, वाकड येथील कल्पतरू हारमोली सोससायटीत बनावट चावीने उघडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.
अन्यथा ही चोरी तीन कोटी रुपयांचा चोरी
चतुश्रृंगी परिसरात बंजन यांच्या घरातून 70 तोळे, 6 किलो 750 चांदी तसेच एक लाख 65 हजार रुपयांच्या मालवार चोरट्यांनी डल्ला मारला आहे. मात्र, बंजन यांनी सोने व चांदि फार वर्षापुर्वी खरेदी केले आहेत. त्यांनी खरेदी करताना सोन्याचा व चांदिचा दर अताच्या दरापेक्षा अत्यल्प होता. त्यामुळे गुन्ह्यात त्याची किंमत 17 लाख 6 हजार रुपये ठरवण्यात आली आहे. अन्यथा आजच्या भावाने हे सोने व चांदि तीन कोटी रुपयांच्या घरात त्याची किंमत आहे.