शहरात धावणार दहा इलेक्ट्रिक बस

0

महापौरांनी दहा किलोमीटर चालवून घेतली चाचणी

पिंपरी-चिंचवड : पर्यावरणपूरक आणि वातानुकूलीत असलेल्या एकूण 25 एसी ‘इलेक्ट्रिक’ बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत. त्यासाठी या बसची शहराच्या विविध मार्गावर चाचणी सुरू आहे. गुरुवारी चिखलीत महापौर राहुल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या बसची चाचणी घेण्यात आली. या दहा बस भाडेतत्वावर शहराच्या विविध मार्गांवर सोडल्या जाणार आहेत. दरम्यान, महापौरांनी ही बस दहा किलोमीटर चालवून चाचणी घेतली.

125 बस भाडेतत्वावर

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी यांचे 60:40 च्या दायित्व प्रमाणात पीएमपीएमएलला इलेक्ट्रिक बसेस देण्यात येणार आहेत. यातील नऊ मीटर मिडी एसी बसची चाचणी घेण्यात आली. या बसची बॅटरी क्षमता, पूर्ण चार्ज केल्यानंतर मिळणारे किलोमीटर, प्रवासी आसनक्षमता, कंफर्ट, एसी इफेक्ट, सस्पेंशन, ऑटो ट्रान्समिशन, मोबाईल चार्जिंग याबाबतची माहिती घेतली. पहिल्या टप्प्यात नऊ मीटर लांबीच्या 25 तर 12 मीटर लांबीच्या 125 बस भाड्याने घेण्याचे नियोजन केले आहे.

निगडी डेपोत चार्जिंग सुविधा

या बसेस पुणे येथे भेकराईनगर डेपो व पिंपरी-चिंचवडमध्ये निगडी डेपो येथे या बसेसच्या चार्जिंग’ची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या बसेसच्या चार्जिंग’साठी अंदाजे तीन तास लागतात. एका चार्जिंग’मध्ये मार्गावरील सर्व थांबे घेतल्यानंतर 183 किलोमीटर ऍव्हरेज’ मिळाला आहे. तर अर्ध्या तासाच्या चार्जिंग’मध्ये 50 ते 60 किलोमीटरपर्यंत ही बस धावू शकते. दररोज 225 किलोमीटर अंतर पार करण्याची क्षमता असून विना थांबा 250 किलोमीटर एसी’सह धावू शकते. याकरिता ठेकेदाराला प्रति किलोमीटर 40 रूपये 32 पैसे दर प्रस्तावित