तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषद अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरातील महत्वाच्या रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई केल्याने घबराट निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा
नगर परिषदेने शहर स्वच्छतेला प्रधान्य देऊन अतिकेमाने हटविण्याची मोहीम सुरु केल्याने शहरातील महत्वाच्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. तसेच अतिक्रमन करणाऱ्यास यामुळे लगाम बसला आहे. काही व्यवसायिकांनी या कृतीकडे दुर्लक्ष करून व्यवसाय सुरु ठेवले होते.हि बाब नगर परिषद अतिक्रमण विभागाच्या नजरेस येताच या व्यवसायीकाच्या मालासह गाड्या जप्त करून त्यांचेवर रीतसर दंडाची आकारणी केली आहे. अतिक्रमण कारवाईमध्ये पडलेल्या अनधिकृत इमारती व टप-या यामुळे झालेला राडारोडा त्वरित उचलून नागरिकांना आवश्यक त्या सोई सुविधा कराव्यात. असे मत नागरिक व्यक्त करत आहे.