पिंप्राळा परिसराह दिक्षित वाडी, सेंट्रल बँक कॉलनीतील घटना ; खिडक्यांमधून हात घालून लांबविला एैवज
जळगाव : शहराती घरफोड्यांच्या सलगच्या घटनानंतर दोन ते तीन दिवसाची विश्रांती घेत चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. विशेष म्हणजे कुटुंबीय घरात झोपले असतांना मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी घरात प्रवेश न करता घराच्या खिडक्या असल्याची संधी साधत रोकड, मोबाईल असा एैवज लांबविला. यात दिनेश रवींद्र बारी (वय-40) रा. भवानी मंदिराच्या पाठीमागे पिंप्राळा यांच्या घश्रातून 50 हजार रुपये रोख व दोन मोबाईल चोरुन नेले, किसन मंगलदास वैष्णव रा. सेंट्रल बँक कॉलनी यांच्या घरातून 5 हजार रुपये रोख व कागदपत्रे लांबविली तर जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भास्कर मार्केट परिसरातील मेडीकल फोडून अडीच हजार रुपये लांबविले, दिक्षितवाडीत घरातील 23 हजार रुपयांचा महागडा मोबाईल लांबविला.
मुलाच्या दवाखान्याच्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला
भवानी मंदिराच्या पाठीमागे पिंप्राळा येथे दिनेश रवींद्र बारी हे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास जेवण करुन बारी कुटूंबीय झोपले, हवेसाठी घराच्या खिडक्या उघड्याच होत्या त्याचा गैरफायदा घेत चोरट्याने थेट खिडकीतूनच आत प्रवेश केला. खुंटीवर टांगलेली रविंद्र बारी यांची खिश्यात पन्नास हजारांची रोकड असलेली पँट, चार्जींगला लावलेले दोन महागडे मोबाईल असा ऐवज घेत चोरट्याने रात्री दोनच्या सुमारास पोबारा केला. रविंद्र बारी यांचा मुलगा गंभीर आजारी असुन ऑक्सीजनवर आहे. त्याच्या उपचारासाठी पैसे लागत असल्याने रात्रीच त्यांनी रक्कम काढून खिश्यातच ठेवली होती. पन्नास हजार रुपये असलेली पँट नेहमीप्रमाणे खुंटीवर टांगलेली होती.
घरापासून काही अंतरावर फेकली पॅन्ट
पँट मधील पैसे काढून भामट्याने बारी यांचय घरा पासुन थोड्या अंतरावर पँट फेकुन पळ काढला. घरात चोरी झाल्याचे बारी कुटूंबीयांना पहाटे चार वाजता कळाले, त्यांनी सकाळीच पोलिस ठाणे गाठून घडला प्रकार कथन करुन तक्रार दिली. रामानंदनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी रविंद्र पाटील, रुपेश ठाकूर यांनी बारी यांच्या घराची पहाणी केल्या तक्रार नोंदवण्यात आली.
गुरुकूल कॉलनीतील मेडीकल दुकान फोडले
भास्कर मार्केट समोरील मेडीकल दुकान फोडून चोरट्यांनी 1 लाख 33 हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना ताजी असताना दुसर्या दिवशी मंगळवारी गुरूकुल कॉलनीतील मेडीकल दुकान अज्ञात चोरट्याने फोडून टेबल्याच्या ड्राव्हरमधील अडीच हजार रूपये रोख चोरीस गेल्याची घटना नुकतीच घडली होती. सेवानिवृत्त विठ्ठल भगवानदा शहा (वय-76) रा. गुरूकुल कॉलनी, एम.जे.कॉलेजजवळ यांचे राहत्या घराच्या खाली विवेकांनद मेडीकल नावाचे दुकान आहे. सेवानिवृत्त असल्याने दुकानाचे कामकाज व देखभाल स्वत: विठ्ठल शहा व सोबत मदतनिस म्हणून सुभान पिंजारी हे करतात. शनिवारी 24 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. तर दुसर्या दिवशी रविवार असल्याने दुकान बंद होते व रात्री उशीरापर्यंत दुकानाला कुलूप व्यवस्थीत असल्याचे पाहिले होते.. सोमवारी 26 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता दुकान उघडण्यासाठी बघितले असता दुकानाचे कुलूप तोडलेले आढळून आले. अज्ञात चोरट्यांनी दुकानातील ड्राव्हरमध्ये ठेवलेले 2 हजार 850 रूपये रोख चोरून नेले. याप्रकरणी विठ्ठल शहा यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास विनोद शिंदे करीत आहे
दिक्षीतवाडीत घरातून महागडा मोबाईल लंपास
जिल्हारुग्णालया समोरील दिक्षीतवाडीत रिचा संदिप जाधव (वय-30) एमएसईबी कार्यालयाजवळ वास्तव्यास आहेत. रविवारी 25 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास दरवाजाच्या खिडकीजवळ कुलरवर मोबाईल चार्ज करण्यासाठी लावून आपल्या स्वयंपाकासाठी घरात निघून गेल्या. तर पती संदीप जाधव हे खासगी नोकरीला कामाला आहे ते देखील डबा घेवून घरातून निघून गेले. पुढच्या घरात कोणीही नसतांना अज्ञात व्यक्तीने चार्ज करण्यासाठी लावलेला 23 हजार रूपये किंमतीचा सॅमसंग मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी रिचा जाधव यांनी मोबाईल चोरी गेल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
खिडकीत हात घालून पाच हजार व कागदपत्रे लांबवले
शहरातील सेंट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा येथील रहिवासी किसन मंगलदास वैष्णव रिक्षाने शाळकरी मुलांची वाहतुक करतात. मंगळवार रात्री 11 वाजता वैष्णव कुटूंबीय जेवणानंतर झोपले होते. चोरट्याने खिडकीतून हात घालून वैष्णव यांचे पाच हजार रोकड असलेले पाकीट, पॅनकार्ड, आधारकार्ड आणि एटीएम कार्ड चोरून नेले. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी रवी पाटील आणि रूपेश ठाकरे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. वैष्णव यांच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.