शहरात पेट्रोल 86.61 ; डिझेल 75 रुपये लिटर

0
पिंपरी : पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन आता पेट्रोल 86.61 पैसे तर डिझेल 74.90 पैसे झाला आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. शहरात सोमवारी 86.45 पैसे दराने मिळणारे पेट्रोल मंगळवारपासून 86.61 पैसे दराने विकले जात आहे. तर सोमवारी 74.70 दराने मिळणार्‍या डिझेलचा भाव मंगळवारपासून 74.90 पैसे झाला आहे. त्याप्रमाणे मावळ भागात सोमवारी पेट्रोलचा भाव 86.76 पैसे होता तो आता 86.92 पैसे झाला आहे. डिझेलच्या दरातही वाढ होऊन मंगळवारी डिझेलचा भाव 74.75 झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.