शहरात प्लास्टिक व्यावसारिकांवर आरोग्य विभागाची कारवाई

0

जळगाव । राज्यात गुढीपाडव्यापासून प्लास्टिक बंदी करण्याता आली असल्याची अधिकृत घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत केली होती. यानंतर कागदी पिशव्या वापरण्याचे आवाहन कण्यात आले. राज्यात प्लास्टिक बंदी झाली मात्र, आजही व्यावसायीकांनी प्लास्टिक वापरणे बंद केलेले दिसून येत नाही. त्यांच्यावर महापालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

शहरातील विविध भागात कारवाई
यानुसार 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बंदीनंतर आरोग्य विभागातर्फे शहरात पहिली कारवाई करण्यात आली असून शहरातील 67 दुकानदार व 3 ठोक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. या तीन ठोक विक्रेत्यांमध्ये फुले मार्केट मधील राधास्वामी प्लास्टीक, राजेंद्र प्लास्टीक यांची गोडावून सील करण्यात आले आहे. तर दाणा बाजारातील दत्त मंदिरा शेजारील शिव प्लास्टीकच्या गोडावून सील करण्यात आले आहे. दरम्यान, आरोग्य विभागातर्फे शहरात विविध पथकांव्दारे प्लास्टिक विक्रेत्यांंवर कारवाई आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. यात दिनेश गोयर, रमेश कांबळे, डी. डी. गोडाले, जे.के. किरंगे, एन. ई. लोखंडे, प्रविण पवार, के.के. बडगुजर, एल. बी. धांडे, एस.के. खान आदींच्या पथकाने कारवाई केली.

32 हजारांचा दंड वसुल
शहरात विविध ठिकाणी प्लास्टिकचे 67 किरकोळ विक्रेत्यांवर 32 हजार 600 रूपयांची दंडात्मक कारवाई करून माल जप्त करण्यात आला. ठोक विक्रेत्यांना प्लास्टीक विक्रेत्यांवर कारवाई होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यांची दुकाने बंद केली. मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने कुलूप बंद दुकांनांना स्वतःचे सील लावले. या गोडावून मधील मालाच्या तपासणीनंतर कारवाई करण्यात येईल अशी माहिती आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी दिली. प्लास्टिक विके्रत्यांवर कारवाई सुरू असल्याने शहरातील इतर प्लास्टिक व्यावसयीकांनी देखील आपली दुकाने बंद ठेवली होती.