शहरात बालकांना ‘दो बुंद जिंदगी के’

0

जळगाव । पल्स पोलिओ मोहिमेचा दुसरा टप्प्यात शहरातील महानगरपालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व महापौर नितीन लढ्ढा यांच्या हस्ते मोहिमेची सुरुवात करण्यात आली. आयुक्त जीवन सोनवणे, महिला बालकल्याण समिती सभापती वर्षा खडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भामरे, डॉ. आर. बी. पाटील, डॉ. जयकर, डॉ.राम रावलाणी, डॉ. मनिषा उगले, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिरीष ठुसे, डॉ. संजय पाटील, डॉ.नेहा भारंबे, विनय महाजन, एस.एम सनेर आदी उपस्थित होते.

फिरते पथकांची नेमणूक
पल्स पोलिओ मोहिमेसाठी एकूण 2 हजार 361 लसीकरण केंद्र संख्या असून त्यापैकी ग्रामीण 2 हजार 43 व शहरी 318, अपेक्षित लाभार्थी एकूण 4 लाख 10 हजार 509 वय वर्षे शून्य ते 5 वर्षे वयोगटातील बालके असून त्यापैकी 3 लाख 5 हजार 666 ग्रामीण व एक लाख 4 हजार 843 शहरी भागातील आहेत.