शहरात बेकायदा दारुविक्री करणार्‍यांवर कारवाई

0

भुसावळ। शहरात बेकायदेशीररित्या देशी-विदेशी व गावठी दारूची विक्री करणार्‍यांंविरुद्ध शनिवार 22 रोजी शहर व बाजारपेठ पोलिसांकडून कारवाई करण्यात आली़. याप्रकरणी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाणे हद्दीतील यावल नाक्याजवळील भिलवाडी येथे झाडाझडती करणण्यात आली असता ज्योती संदीप महाजन (वय 48) या महिलेच्या ताब्यातून 525 रुपये किंमतीची सात लीटर गावठी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी विजया घेटे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तर दुसरी कारवाई बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली़ आशिया महामार्ग क्रमांक 46 वरील लक्झरी बसस्थानकाजवळ संशयित आरोपी मनीष मोहनलाल गोग्या याच्या ताब्यातून चार हजार 320 रुपयांचे देशी-विदेशी दारु जप्त करण्यात आली. त्यात 850 रुपयांचे देशी दारूच्या बाटल्या, एक हजार रुपये किंमतीची विदेशी दारू तसेच दोन हजार 480 रुपये किंमतीच्या बीअर जप्त करण्यात आल्या आहेत.