पिंपरी चिंचवड : ‘मनसे आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत शहर मनसेच्या वतीने दि. 25 फेब्रुवारी ते 2 मार्च या दरम्यान चिंचवड विधानसभेतील सर्व कार्यकत्यांसह 800 व्यक्तींच्या भेटी-गाठी घेण्यात आल्या. चिंचवड विधानसभेतील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी घरोघरी जाऊन मनसे या पक्षाविषयी माहिती देत नागरिकांची विचारपूस केली, अशी माहिती मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.
यावेळी पिंपरी चिंचवड प्रभारी किशोर शिंदे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हेमंत डांगे, उपशहर अध्यक्ष बाळा दानवले, राजु साळवे, राहुल जाधव, विशाल मानकरी, संजय यादव, मयुर चिंचवडे, रुपेश पटेकर, महिलाध्यक्षा अश्विनी बांगर, सिमा बेलापुरकर, स्नेहल बांगर, प्राजक्ता गुजर, अनिता पांचाळ, अनिकेत प्रभु, सुरेश सकट, प्रमेश्वर चिंलरगे, अक्षय नाले, सचिन मिरपगार, सचिन भोडवे, प्रतिक शिंदे, रोहित काळभोर, निखील गावडे, विकास कदम, निलेश नेटके आदी पदाधिकारी उपस्थित होते.