शहादा । शहादा शहरात गेल्या दोन वर्षापूर्वी मुख्य चौकांमध्ये व संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही कँमेरे लावले होते, ते नसल्याने पोलीस तपास कामात अडचणी येतात म्हणून शहराची सध्याची परिस्थिती लक्षात घेता सीसीटीव्ही कँमेरे लावण्यात यावेत जे कार्यान्वित नाही. त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी आहे. पोलीस प्रशासनामार्फत वरिष्ठ अधिकार्यांचा आदेशान्वये शहरात एकूण 17 सीसीटीव्ही कँमेरे लावण्यात आले होते. त्यापैकी आता चार ते पाच कँमेरे कार्यान्वित आहेत. उर्वरित कँमेरे कुठे आहेत याची कोणालाही कल्पना नाही.
गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी कॅमेर्याचा वापर
शहराचा सर्वे करून ज्या ठिकाणी कँमेर्यांची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी कँमेरे लावली होती. गेल्या दोन वर्षात झालेल्या मोठ्या घटना वाढती गुन्हेगारी, गुंडगिरीचा पार्शभूमीवर, शिवाय येणारा गणेशोत्सव बघता त्वरित सीसीटीव्ही कँमेरे लावणे गरजेचे आहे. माहिती मिळवली असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील, जामा मशीद चौक, आझाद चौक, शासकीय विश्राम गृहाजवळील कँमेरे सुरु आहेत. शहरात आजच्या परिस्थतीत सप्तशृंगी माता मंदिरजवळ, भगवा चौक, महाराणा प्रताप चौक, पटेल रेसिडेन्सी चौक, डी.के.मार्केट जवळ, गरीब नवाज कॉलनी, गस गोडावून जवळ, पाडळदा चौफुली, पाण्याच्या टाकीजवळ, तूप बाजार, हुतात्मा चौक, सोनार गल्ली, आझाद चौक, बागवान गल्ली, जनता चौक येथे कँमेरे लावण्याची आवश्यकता आहे. पर्यायाने गुन्हेगारांचा शोध घेण्यासठी या कँमेर्यांचा उपयोग होणार आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था बाबत उपाय योजना करावी. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी पाठ पुरावा करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.