शहरात 1 ते 3 जूनदरम्यान खान्देश नाट्य महोत्सव

0

भुसावळ- शहरात नानासाहेब देविदास गोविंद फालक स्मृतीनिमित्त तीन दिवसीय खान्देश नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 1 ते 3 जून दरम्यान शहरातील श्रीकृष्णचंद्र सभागृहात हा महोत्सव होईल. . या तीन दिवसीय नाट्य महोत्सवात ‘बाप हा बापच असतो’, ‘जनक’, ‘दगडाला शिकव धडा’ (बालनाट्य), ‘पुस्तक एके पुस्तक’ (बालनाट्य), ‘चार दिवस प्रेमाचे’ अशा नाटकांचा समावेश आहे. शिवाय परीवर्तन चित्र षसाक्षरता प्रदर्शनाचे राधेश्यामजी लाहोटी तर नाट्य महोत्सवाचे मोहन फालक यांच्या हस्ते उद्घाटन होईल. प्रमुख अतिथी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, प्रा.जतीन मेढे, डॉ.आशुतोष केळकर, अरुण मांडाळकर, पंडीतराव सुरवाडे, रघुनाथ अप्पा, महेश फालक, सविता अग्निहोत्री, बद्रीनारायण अग्रवाल, सुरेश पाटील, विलास चौधरी, सोनू मांडे आदींसह मान्यवरांची उपस्थिती राहील.