शहरासाठी स्वतंत्र वीज वितरण मंडळ स्थापन करावे

0

आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली मागणी

पिंपरी-पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पिंपरी व भोसरी अशी दोन वीज वितरण विभागीय कार्यालये असुन ही कार्यालये पुण्यातील गणेशखिंड मंडळ कार्यालयांतर्गत जोडली आहेत. परंतु शहरातील नागरिकांना वीज समस्यांसाठी पुणे शहरात जवळ्पास 10 किमी दूर जावे लागते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र वीज वितरण मंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे. शहरातील नागरिकांना वीज समस्यासाठी पुणे शहरात जवळ्पास 10 किमी दूर जावे लागते.

पुर्नरचना करणे आवश्यक
आमदार जगताप पुढे म्हणाले की, सध्या शहरात उच्च्दाब ग्राहक व लघुदाब ग्राहक सुमारे 602289 आहेत. 2 लाख ग्राहकांना एक विभागीय कार्यालय या नुसार शहराची तीन वीज वितरण विभागीय कार्यालयाची गरज आहे. तीन विभागीय कार्यालयांसाठी एक मंडळ कार्यालय याप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहराला वीज अधिकारी कर्मचारी व कार्यालये यांची पुर्नरचना करणे आवश्यक आहे. भविष्यात या भागात मोठ्या प्रमाणात नागरिकवस्ती वाढत आहे. पुढील काळात ही ग्राहकसंख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने ही रचना करणे आवश्यक आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महसूल, पोलीस यांची स्वतंत्र कार्यालये करण्यात आलेली आहेत. इतर शासकीय कार्यालयांचीही स्थापना करण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे. तरी, पिंपरी-चिंचवड शहरासाठी वीजवितरण कार्यालयांची पुर्नरचना करून शहरासाठी स्वतंत्र मंडळ कार्यालय तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी लेखी निवेदनाव्दारे आमदार लक्ष्मण जगताप यांनी उर्जा मंत्री चंन्द्रशेखर बावनकुळे यांना केली आहे.