शहादा । शहरात स्वच्छतेचे तीन तेरा झाले आहेत. खेतीया रस्त्यावर तेरापंथी भवनजवळ हॉटेल अनिल पॅलेसला लागुन भयानक प्लॅस्टिकचा पिशव्यांचा ढिगारा आहे ज्याचामुळे सर्बत्र दुर्गंधी पसरते. या ढिगार्राचा प्रथम दर्शनी लक्ष जाणे म्हणजे पालिका प्रशासनाचे स्वच्छता विभागाचे लक्तरे उघडे पडणे. गेल्या दोन महिन्यापासून हा ढिगारा जैसे थे आहे मछी बाजारात देखील तीच स्थिती आहे.प्लॅस्टिक बंदीबाबत पालीका प्रशासनाने ठोस कारवाई अद्याप केलेली नाही.
प्रशासनाची कमालीची उदासिनता
नगरपालिकेने स्वच्छ महाराष्ट्रमिशन अंतर्गत स्पर्धेत भाग घेतला. अनेक ठिकाणी कचर्याचे ढिग पडले आहेत तर सर्वाधिक गंभीर समस्या प्लॅस्टिकचा पिशव्यांची आहे. एका बाजुला शहरातील सेवाभावी संस्था स्वतःहुन शहरात स्वच्छतेचा उपक्रम राबवतात मात्र दुसर्या बाजुला पालिका प्रशासनाची कमालीची उदासिनता आहे म्हणुन प्रथम पालिका कर्मचार्यांचे प्रबोधन आवश्यक आहे तेवढ्याच प्रमाणात नगरसेवकांची देखील स्वच्छतेची जबाबदारी आहे. केवळ बोटावर मोजता येतील नगरसेवक मनपासुन स्वच्छतेचा प्रश्नाबाबत लक्ष केंद्रीत करतात. घंटागाडी बाबत नवीन नियमावली आणावी अशी मागणी आहे. केवळ नावाला दुकानदाराना नोटीसा दिल्या होत्या. जिल्ह्यात सर्वात जास्त प्लॅस्टिक पिशव्यांची घाण शहादा शहरात आहे म्हणून दंडात्मक कारकाइ अपेक्षीत आहे. वार्डा वार्डात डसबीन ठेवले जातील ही घोषणा पालिकेने केली होती ते केवळ आश्वासन ठरले आहे.
रस्ते साफ करण्याचे यंत्र आहे पण रस्तेच खराब असल्यांने ते पडुन आहे हे विशेष आहे. शहरात पाहिजे तशी जनजागृती झाली नाही काही मोजक्या ठिकाणीच फलक होते ते ही आता दिसेनासे झाले आहेत दोंडाईचा रस्त्यावरील डंपींग ग्राउंड वरील कचरा रस्त्यावर येतो त्याची कोणतीही उपाययोजना नाही. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या स्वच्छतेबाबत चांगला प्रयत्न आहे पण तो प्रत्यक्षात न आल्याने शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे सर्वच नगरसेवकानी स्वच्छतेबाबत लक्ष घातल्यास शहादा शहर स्वच्छ सुंदर बनु शकते पण केवळ शासनाच्या उपक्रम राबवणे हा प्रयत्न नको प्रत्यक्ष कृती करणे अपेक्षित आहे.