पिंपरी-चिंचवड : शहरामध्ये इसिए संस्थेकडून पर्यावरण संवर्धनाचे काम केले जाते. समितीचे अध्यक्ष विकास पाटील आणि विश्वस्त विनिता दाते यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण समितीचे काम सुरू असते. या समितीत असणारे सर्वचजण सेवानिवृत्त असल्याने या कामासाठी बराच वेळ देता येतो. विद्यार्थी हे भारताचे भावी आधारस्तंभ आहेत. त्यामुळे विद्यार्थी दशेतच त्यांच्यावर पर्यावरणाचे संस्कार करण्यासाठी सर्व शाळांंमध्ये विद्यार्थी पर्यावरण समिती स्थापन केल्या आहेत. विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे दूत बनविले. त्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत 112 केंद्रांवर ई वेस्ट संकलन केले जाते. ई वेस्ट आणि प्लास्टिकचा दुष्परीणाम नागरिकांना दिसून येत आहेत. गणेशोत्सवामध्येही ईसिएमार्फत मुर्ती दान, निर्माल्य दान उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरणपूरक गणपती बनविण्याची कार्यशाळा शाळा, महाविद्यालये, सोसायटींमध्ये राबवून उत्तम प्रतिसाद मिळाला. इसिएने अर्जुन वृक्षाच्या बियांचे आणि कंपोस्ट खतांचे वाटप करून वृक्षलागवडीचा उपक्रम राबविला आहे. ‘एक मूल एक झाड’ ही संकपल्पना राबविण्यात आली आहे. ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी दिवाळी शपथ पत्रकांचे वाटप करण्यात आले आहे. या पत्रकांमुळे मागील दिवाळीमध्ये मोठा परिणाम दिसून आला. यावर्षी ही याचा परिणाम या दिवाळीमध्येही दिसून येईल यात शंका नाही. शहर प्रदुषणमुक्त, पर्यावरणमुक्त व स्मार्ट सिटी बनविण्याचा ध्यास रहाणार आहे.