शहर ब्राह्मण संघातर्फे भगवान त्रिविक्रमास जलाभिषेक

0

शेंदुर्णी। सध्या पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या संकटात आहे. शेतातील पिके हातची जाण्याची भिती असुन दुबार पेरणी जर करावी लागली तर या आर्थिक व मोठ्या संकटात शेतकरी सापडला आहे. तेव्हा सर्वत्र जोरदार पाऊस व्हावा यासाठी शेंदुर्णी शहर ब्राह्मण संघातर्फे वैदिक मंत्रोच्चारात शेंदुर्णीचे ग्रामदैवत भगवान श्री.त्रिविक्रमास जलाभिषेक करण्यात आला.दररोज जलाभिषेक जोरदार व संततधार पाऊस व्हावा व वरुणराजाने कृपा दृष्टी ठेवावी अशी प्रार्थना होत आहे