यावल। पोलीसांनी मंगळवार 4 रोजी मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करुन दंड वसुल केला. तसेच काही वाहनाचालकांना न्यायालयीन कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यावल पोलिसांनी धडक मोहिम राबवली स्वत: पोलिस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर या मुख्य रस्त्यावर थांबुन वाहनांवर कारवाई करताना दिसले सोबत शहरात व राज्यमार्गावर वाहतुक पोलीस जगदिश पवार, हवालदार संजीव चौधरी, विजय चौधरी, वाहतक पोलीस बाविस्कर आदींचे पथक होते.
या परिसरात झाली कारवाई
शहरातुन जाणार्या चोपडा रस्त्यावर वनविभागाचे कार्यालजवळ, भुसावळकडे जाताना टी पॉईट व फैजपुर रस्त्यावरील महाविद्यालय या ठिकाणी पथक नियुक्त करण्यात येऊन नियम मोडणार्या वाहनधारकांनावर कारवाई करण्यात आली. या कारवाइमुळे अवैध वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे.