शहादा तालुक्यात 44 जागांकरीता 45 नामनिर्देशनपत्रे दाखल

0

पाडळदा। शहादे तालुक्यातील कानडीत ह. दोंदवाडा, कनसई, पिंपर्डेसह गावाच्या पोटनिवडणुका 27 मे रोजी होत असून उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी 12 मे रोजी 44 जागांकरीता 45 नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले होते. 15 मे रोजी अर्जाच्या छाननीअंती 5 नामनिर्देशन पत्र विविध कारणामुळे निवडणूक अधिकार्‍यांनी बाद ठरविले असल्याची माहिती तहसिलदार मनोज खैरनार यांनी दिली आहे. 18 गाव ग्रामपंचायतीच्या 22 जागाकरीता एकही नामनिेर्देशन पत्र दाखल झाले नसल्याने या जागा पुन्हा रिक्त राहणार आहेत.

कानडीत 19 अर्ज
कानडीत ह. येथे मुदतीत 19 उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. पैकी मांगु धुमा पवार यांची वार्ड क्र.1 मध्ये सर्वसाधारण महिला राखीव जागेवर उमेदवारी अर्ज भरल्याने मंगु धुमा पवार (पुरूष) यांचा अर्ज बाद करण्यात आला. तसेच जंदा मोग्या ठाकरे यांनी 1 व 3 वॉर्डात अर्ज दाखल केले होते. जात पडताळणी प्रमाणपत्र, टोकन आदीसह अर्जावर अंगठे/ सह्या नसल्याने अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी जी.बी.धाकड यांनी दिली.

चित्र 17 मे नंतर स्पष्ट होणार
कनसई वार्ड क्र.तीनमध्ये दिलीप भान्या पावरा यांचा अर्ज जात पडताळणी पत्र तसेच टोकन मतदार यादीत मतदार असल्याचा पुरावा दिला नाही. आदी कारणावरून अर्ज बद केला तर दोंदवाडे ग्रा.पं.वार्ड क्र. 1 मध्ये ओबीसी महिला राखीव जागेसाठी वैशाली ओंकार पवार यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी तसेच टोकन मुदतीत दाखल न करू शकल्याचे नामनिर्देशेन पत्र रद्द करण्यात आले. आता 44 जागांसाठी 40 नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आलेत. कनसई, पिंपर्डे, दोंदवाडे व कानडीत ह. आदी गावातील निवडणुकीचे चित्र 17 मे नंतर स्पष्ट होणार आहे. सुमारे 18 गाव ग्रामपंचायतीच्या 22 जागाकरीता एकही नामनिेर्देशन पत्र दाखल झाले नसल्याने या जागा पुन्हा रिक्त राहणार आहेत. तहसिलदार मनोज खैरनार यांचे मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार डॉ.उल्हास देवरे, निवडणूक अधिकारी जी.बी.धाकड, एस.आर.लहाने, एस.जी.शिरसाठ, शिरीष परदेशी, समाधान पाटील, किशोर आर.लहाने, एस.जी.शिरसाठ, शिरीष परदेशी, समाधान पाटील, किशोर भार्दुगे, आनंद महाजन आदी निवडणुकीचे कामकाज पाहत आहेत. 17 मे रोजी माघारीची तारीख असून 27 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे.