शहादा परिसरात आजी-माजी शिक्षकांचा गौरव

0

शहादा । परिश्रमाशिवाय यश मिळत नाही म्हणून परीश्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे तसेच स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी रक्त आटवावे लागते असे प्रतिपादन माजी प्राचार्य बी.पी.गगराणी यांनी संकुलात आयोजित आजी माजी सेवकांच्या सत्कारप्रसंगी केले. संस्थेंचे विभागीय सचिव प्रा. संजय जाधव यांना डि. लीट. उपाधी मिळाल्याबद्दल आयोजित सोहळयात , शैक्षणिक वर्षात संकुलातील विविध पुरस्कार प्राप्त सेवक आणि आजी माजी प्राचार्य , प्राध्यापक व शिक्षक यांच्याही सत्कार सस्थेचा वतीने करण्यात आला.

आनंदसोहळ्यात भिजली मने
या आनंद सोहळ्यात प्रा संजय जाधव यांच्या सत्कारगुरु बी.पी.गगराणी, जे.डी पाटील व एस.डी.खेडकर यांच्या हस्ते करण्यात आला . तसेच मुख्याध्यापक संजय राजपूत , डॉ. अशोक पाटील , पर्यवेक्षक सुनिल सोमवंशी , एस. पी. जोशी , प्रा. राजेश सोनवणे ,प्रा. तायडे , प्रा. डी. वाय . पाटील , प्रा. गणेश सोनवणे , शेवाळे सर , डी. आर. पाटील, डी. डी. तांबोळी., खगेंद्र कुंभार, प्रा ए. एम . वळवी यांच्याही सत्कार झाला. सेवानिवृत्तीचे वीस वर्ष पुर्ण केल्याने गगराणी , सतरा वर्ष पुर्ण झाल्याने जे. डी. पाटील , सात वर्ष पुर्ण झाल्याने एस. डी. खेडकर व जिवन जयस्वाल यांच्याही संस्थेने गौरविले.

याप्रसंगी बोलतांना प्राचार्य जे. डी. पटेल यांनी ज्यांच्याकडून सत्कर्म घडते त्यांच्या सत्कार होतो. हा सत्कार म्हणजे पुढील वाटचालीसाठी प्रेरणा असल्याचे म्हटले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक वर्षा जाधव, हिमांशु जाधव, प्रा. किरण भावसार, स्वप्निल कुलकर्णी , कैलास सोलंकी , देवेंद्र बागुल, प्रकाश शिरसाठ यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक वर्षा जाधव यांनी तर सुत्रसंचालन व आभार प्रा. अनिल साळुंखे यांनी व्यक्त केली.