वकृत्व स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींचे केले कौतूक
शिक्षक हे सर्वच समाजाचे जबाबदार घटक – मौलवी झकेरिया
शहादा – येथील उर्दू गर्ल स्कूलमध्ये माजी विद्यार्थी व पालकांचा मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक लियाकत अली सय्यद होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.विश्वासराव पाटील, प्राध्यापक संजय जाधव, जामा मशिदीचे इमाम मौलवी जकरिया, इमाम मशिदीचे हाफिज नोमान हनीफ कासम, नाजीम कुरेशी, जहांगिर कुरेशी, प्राचार्य कुरेशी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रथम विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वकृत्व स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींचे देखील कौतुक करण्यात आले.
मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
यावेळी बोलताना प्रा.डॉ. विश्वासराव पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या व संस्थेच्या योगदानासाठी सहकार्य करीत राहावे. विद्यालयाने दिलेली संस्काराची देणगी आपण आयुष्यभर उपयोगात आणावी संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन करून माजी विद्यार्थ्यांना जगण्याची प्रेरणा दिली असे सांगितले. मौलवी झकेरिया यांनी बोलताना शिक्षक हे समाजाचे जबाबदार घटक आहेत.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
समाजाला एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो. आजचा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग असून विद्यार्थ्यांनी सामाजिक हित जोपासावी असे आव्हान केले. याव्यतिरिक्त प्राध्यापक लियाकत अली सय्यद यांनीही मनोगत व्यक्त केले तर सत्कारार्थी माजी विद्यार्थी फरीद शहा सिराज अहमद अन्सारी यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला संस्थेचे संचालक शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य कुरेशी यांनी केले तर सूत्रसंचालन इरफान पठाण यांनी केले.