शहादा। कोविड -१९ या विषाणूचा फैलावाने सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी शहादा येथील खिदमत फाऊंडेशनच्या मित्रांनी जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करुन शहरातील गरीब कुटुंबियांना वाटप करण्यात येत आहे. सुमारे ४ हजाराहुन अधिक जिवनावश्यक वस्तुंचे किट जात पात न बघता गोरगरीब कुंटुबीयांना मदतीचा हात दिला जात आहे.
कोरोना या विषाणूचा संकटामुळे सर्वत्र सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अनेक लोक घरात बंदिस्त आहे. मोलमजुरी करून उपजीविका भागवणाऱ्यांचे मात्र हाल होत आहेत. रोजगार बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शहादा येथील खिदमत फाऊंडेशन मित्रांनी सामाजिक भान जोपासत गरिब नवाज काॅलनी, महालक्ष्मीनगर , श्रमिक नगर, सालदार नगर, शिवाजी नगर , पंचशिल काॅलनीसह परिसरातील गरीब कुटुंबांसाठी जीवनाश्यक वस्तुंचे किट तयार करुन घरोघरी जाऊन वाटप करण्यात येत आहे. शहरात खिदमत फाऊंडेशन उपक्रमांची सर्वत्र कॊतुक करण्यात येत आहे.