शहादा। येथे दि. 14 रोजी दोन गटात झालेल्या हाणामारीत नगरसेवक यांचे प्राण गेल्यानंतर गरीब नवाज कॉलनीत दुकानाची जाळपोळ घरावर दगडफेक करण्यात आली होती. संतप्त जमावाने गाड्यांची ही तोड्फोड केली होती त्यात पोलीसांच्या गाड्याही लक्ष करण्यात आल्या होत्या. काल उशीरा मयत सद्दाम तेली यांचेवर स्मशानभुमीत दफनविधी करण्यात आला. यावेळी सद्दाम तेली यांचे समर्थक नातेवाईकासह समाजाचा मोठा जमाव झालेला होता. दि.15 रोजी रात्री दोनवेळा आरोपींच्या घरावर दगडफेक केली. परिस्थिती बघता पोलिसांनी गरीब नवाज कॉलनी परिसरात नाकेबंदी केली होती.
पोलिसांचे अटकसत्र सुरू
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील वाढीव पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे माजी उपनगराध्यक्ष मुक्तार शे. यांच्या निवासस्थान परिसरात कमालीच्या मोठा बंदोबस्त आजही कायम होता. काल जाळण्यात आलेल्या दुकानामधुन धुर निघतच होता. मुक्तार शे. यांचा पुर्ण परिवार त्याभागातुन हलवण्यात आले आहे. आजही पोलीसानी अटकसत्र सुरु ठेवले आहे.
पाच जखमींवर रुग्णालयात उपचार
पाच जखमींवर शहरातील डॉ. बी. डी. पाटिल यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस उपाधिक्षक महारु पाटील सह जखमी पोलीस कर्मचार्यांवर उपचार करण्यात आलेत. जमाव पोलीसाना जुमानत नव्हता म्हणुन पोलीसानी बळाच्या वापर केला.त्या परिसरात पोलीसानी प्रवेश बंदी केली आहे. नागरीकानी अफवावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलीस करीत आहेत.
शहरातील सर्व दुकाने बंद,गस्त सुरु
मुस्लीम बांधवांच्या जमाव गटागटाने ठिकठिकाणी थांबुन होता. अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे थांबुन आहेत.तर गरीब नवाज कॉलनीला लागुन असलेला पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आला आहे.सकाळी अकरा वाजेनंतर शहरातील सर्व दुकान बंद होते. पोलीसानी शहरात पुर्णपणे गस्त सुरु केली आहे. खबरदारी म्हणुन चौकाचौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मेनरोड मुख्यबाजार पेठ नगरपालीका परिसर काशीनाथ मार्केट शास्त्री मार्केट खेतीया रस्त्यावरील सर्व दुकान बंद होते.