शहादा: येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या औषध निर्माण शास्ञ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल पवार व त्यांच्या सहकारी प्राध्यापकांनी लिहिलेल्या करोना व्हायरसवरील लेख युरोपियन जनरलमध्ये 01 एप्रिलला प्रसिध्द होणार आहे. करोना अर्थात कोवीड 19 या विषयांवर त्यानी तिन हजार आठशे शब्दांचा लेख ऑनलाईन पाठवला होता.या लेखाची निवड झालेचे पञ प्राप्त झाले आहे.
या लेखात कोरोना विषाणू बाबत मूलभूत तत्वे आणि माहिती व सर्वसाधारण मार्गदर्शक सूचनांचा समावेश आहेत त्याचप्रमाणे या जीवघेण्या विषाणूपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी सर्वसाधारण लोकांसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीचा समावेश आहे प्राचार्य डॉक्टर पवार यांच्यासह चारही प्राध्यापकांनी या लेखाद्वारे अशी शिफारस केली आहे की विषाणूच्या संक्रमाना बाबत वेळोवेळी सतत जनजागृती व शिक्षण अभियान चालवणे या आजाराबाबत सामान्य मार्गदर्शक तत्त्वे आणि लक्षणे कोरणा सरकार बाबत ची काळजी आणि उपचार याबाबतही माहिती प्रदान करण्यात आलेली आहे कोरोना विषाणू हा एक प्रकारचा कवचकुंडले अविभाजित आर एनए विषाणु असून मानवी व सस्तन प्राणाशी तो निगडीत असतो विषाणूची तीव्रता अत्यंत गंभीर असून यामुळे मनुष्यप्राणी दगावण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक जास्त असल्याचे लेखात म्हटले आहे
हा लेख प्राचार्य डाॅ एस बी पवार, प्रा. सुलभा पाटील प्रा. संदिप तडवी व प्रा. विपुल जैन या चौघांनी लिहिला असून सदर लेख एक एप्रिल रोजी संपूर्ण युरोप खंडात प्रकाशित करण्यासाठी स्वीकारण्याचे पञ युरोपियन जनर्नल चे मुख्ख संपादक डाॅ व्हेलेटिना यानी पाठवले आहे. जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. या लेखातून जगभरातील तज्ञाना मार्गदर्शन मिळणार आहे. करोना बद्दल जागृतता व्हावी या उद्देशाने लेख लिहिला आहे.