शहादा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंंभाचे आयोजन

0

शहादा । येथील म्युंसिपल हायस्कुल शेजारी असलेल्या तालुका क्रिडा संकुलात जय वाल्मिकी युवा मंचतर्फे आयोजित शैक्षणिक वर्ष 2016-2017 मध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन रविवार 30 जुलै 2017 रोजी शहादा येथे करण्यात येणार आहे.

दहावी व बारावीला 70 टक्क्यांच्या पुढे गुण प्राप्त तसेच पदवी व पदवित्तर 60 टक्के हून अधिक पुढे गुण प्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्याचे योजिले आहे. म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना सूचित करण्यात येते की, विद्यार्थ्यांनी स्वतः किंवा पालकांनी आपल्या पाल्यांचे गुणपत्रक जय वाल्मिकी युवा मंचच्या सदस्यांकडे मंगळवार 25 जुलै 2017 पर्यंत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवर विविध स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करणार आहेत. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या उमेदवारांनी हजर रहाण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.