शहादा। शहरातील महिलांनी बैलपोळा निमित्त बैलांचा पूजेसाठी तयारी केलेली होती. परंतु त्यांना बैलांचे दर्शनच झाले नाही. अशी परिस्थिती पहिल्यांदा निर्माण झाली बैलांची संख्या कमी झाल्याने हा सण आता नावाला राहिला आहे. शहरात प्रेस मारुती मंदिराजवळ शेतकरी अथवा शेतमजूर आप आपले बैल स्वच्छ करुन त्याना सजवुन आणण्याची प्रथा आहे. पण मंदिराजवळ अधुन मधुन बोटावर मोजता येतील एवढेच बैल दिसले. गल्लीबोळात महिला आप आपले ताट नैवद्य घेवुन बैलांची वाट पहात होते. परंतु काहींचा भाग्यात बैल पुजेला मिळालेत तर काहीना बैलांचे दर्शन झाले नाही. काही महिलांना आप आपले ताट परत न्यावे लागले.
सारंगखेडा यात्रेत निरुत्साह
यांत्रीकी शेती झाल्याने शेतकर्यांकडे बैलांची संख्या कमी झाली आहे. सामान्य शेतकरी हा देखील भाड्याने ट्र्क्टरचा वापर करु लागला आहे. ग्रामीणभागात देखील माहिती घेतली असता पोळ्याला अल्प प्रतिसाद होता. शेतकर्यांमध्ये पावसाचे प्रमाण बघता निरुत्साह होता. गेल्या वर्षी सारंगखेडा यात्रेत फक्त पाचच बैलांची विक्री झाली होती. याचा अर्थ शेतकरी यांत्रीकी शेतीवरभर देत आहे. शहादा तालुक्यात बैलांची संख्या भुतेअकसपुर ,जावदा, नवागाव ,दरा, राणिपुर पिंप्राणी जामजावदा ,शहाणा, लंगडी भवानी ,दुधखेडा परिसरातच आहे. एकंदरीत यावर्षी पावसाचे कमी प्रमाण बघता तालुक्यात पोळासणाबाबत कमालीचा निरुत्साह दिसुन आला.