शहादा येथे हजारो लिटर पाणी रस्त्यावर !

0

शहादा । एकीकडे शुद्ध पाण्यापासून नागरिक वंचित राहत असतानाचे चित्र असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावरून वाहून जात असल्याचा संतापजनक प्रकार डोंगरगाव रस्त्यावर समोर आला आहे. आदित्य हॉस्पीटल जवळील जलवाहिनीला गळती लागल्याने हे पाणी रस्त्यावर वाहत आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे लक्ष देऊन तत्काळ ही गळती थांबवून पाणी वाचवावे, अशी मागणी होत आहे.

जलशुद्धीकरण केंद्र
नागरिकांना शुध्द पाणी हे दिव्य स्वप्न वाटत होते, मात्र तक्रारी वाढल्यानंतर हळु हळु उर्वरीत वसाहतीत जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले. 27 कोटी रुपये खर्चाची योजना सारंगखेडा येथे तापीनदीचा पात्रातुन पाणी जलवाहिनीने शहादा शहरापर्यंत आणण्यात आले. भेंडवा नाल्याजवळ जलशुध्दीकरण केंद्र करण्यात आले आहे. तेथुनच शहरातील सर्व टाक्यामध्ये पाणी टाकले जाते.

वाहतुकीचा प्रश्‍न
पालिकेच्या दुर्लक्षामुळे पाणी रस्त्यावर वाहत असताना नागरिकांनामधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनीची गळती थांबवावी अशी मागणी आहे दखल म्हणुन केवळ खड्डा खोदून न ठेवता प्रत्यक्ष कार्यवाही महत्वाची आहे. चौफुली वरच खड्डा असल्याने वाहनाना सांभाळून रस्त्यावरुन वाहतूक करावी लागत आहे. खड्डा त्वरीत बुजवावा अशी मागणी होत आहे.

आरोग्याचा प्रश्‍न
एका बाजुला नगरपालीकाप्रशासन व शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करुन शहराला शुध्द पाणीपुरवठा केला जातो मात्र दुसर्‍या बाजुला जलवाहीनीला गळती लागल्याने पाण्याची मोठ्याप्रमाणात नासाडी होत आहे. गळतीमुळे पाण्याची मोठी डाब साचली आह. त्यामुळे घाणीचे साम्राज्य तयार होवु लागले आहे. परिसरातील नागरीकांचा आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.